Wednesday, November 18, 2009

वाहत्या या वाऱ्याला,,,,
कधीच थांबवायचं नसतं....
मनातील दुखांना मात्र,,,
नेहमीच आवरायचं असतं....

समुद्राच्या लाटांना,,,,
कधीच अडवायचं नसतं....
नयनांच्या आसवांना मात्र,,,
पापण्यातच थांबवायचं असतं.....

फुलाच्या गंधाला कधीच,,,
दरवळल्यावाचून ठेवायचं नसतं.....
तुझ्या आठवणींच्या गंधाला मात्र,,,
मनातच जखडायच असतं......

इंद्र-धनुच्या रंगांना,,,,
इकडे-तिकडे पसरवायच नसतं....
आयुष्यातील प्रत्येक रंग,,,,
जरी बिखरलेलं असतं..........

पक्ष्यांच्या मंजुळ स्वरांना,,,
गप्प करायचं नसतं.....
मनातील इच्छांना मात्र,,,
ऐकून सोडायचं असतं.....

पंखांच्या भरारीला,,,,
कधीच कापायचं नसतं....
आपल्या मिलनाच्या स्वप्नाला मात्र,,,,
डोळ्यातच दाबायचं असतं....

का वेडं मन असं,,,,
इच्छा बाळगत असतं......
तू येणार नाहीस हे जसं,,,,,
त्याला ठाऊकच नसतं..............

चिंब पावसात भिजताना !!!!
Labels: पाऊस 0 comments
चिंब पावसात भिजत होते........
भिजताना क्षण क्षण
तुलाच आठवत होते....
तू येणार नाहीस हे,
मन जानातही होते.....
तरीही नयनांचे मन,
तुलाच शोधत होते....
चिंब पावसात भिजताना,
एक मात्र बरे असते...
तुझ्या आठवणीतल्या आसवांना,
कोणीच ओळखत नसते....
चिंब चिंब भिजताना,
तुझी सोबत हवी-हवीशी वाटते...
तुझ्या शिवाय जगताना,
मला जगणेच उमगत नसते....

वाट
on गुरुवार २९ ऑक्टोबर २००९
Labels: तू, वाट 0 comments
तू नाहीस तरी आठवणी तुझ्या आहेत अजुनही
फूल केव्हाच सुकून गेलय.....
परंतु गंध ओला आहे अजुनही
वादळ कधीच शांत झालय.....
तरी वारा वाहतो आहे अजुनही
वाट बदलली मी तरी.....
पाउलखुणा दिसतात तुझ्या अजुनही
रानातून एकटे फिरताना.....
साथीला आवाज
रंग सारे संपले माझे तरी.....
अधूरे आहे चित्र अजुनही
दिलास तू आकार मजला.....
निर्विकार मी अजुनही
फोटो तुझा पाहूनहीं.....
काहूरमनी उठते अजुनही
तू परतणार नाहीस हे माहित असुनही.....
वाट तुझी पहाते मी अजुनही
वाट तुझी पहाते मी अजुनही ......!!
वळुन पाहिले प्रत्येक वळणावर
कधी तरी तुझी साद येईल...
ना वाटले कधी प्रेम तुझे
इतक्या लवकर कच खाईल...

ना केली मी पर्वा स्व:ताची ,
ना मला तमा या जगाची...
तुझ्या सहवासात आयुष्य जावं
हीच एक इच्छा मज वेडीची...

तु मात्र कधी जाणली नाहीस
किंम्मत त्या प्रेमाची...
मायेच्या नात्यांपुढे जळु दिलीस
स्वप्न आपल्या प्रीतीची..

सांभाळु ना शकलास तु
नात्यांचा हा डोलारा...
ना उरले हाती माझ्या काही,
विस्कटत गेला डाव सारा...

अजुनही वेड्यागत मी
तुझ्यावर प्रेम करते...
सहवासातले क्षण सोबतीला
आयुष्याची नाव हाकते..

जाणते आता कधीच न येणार
तुझी ती प्रेमळ साद...
पण शेवटच्या श्वासापर्यंत असेल
तुझ्या आठवणींशी संवाद...
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा