Saturday, September 5, 2009

इथे प्रत्येकाला आहे आपले दुःख
प्रत्येकाची एक वेगळी कहाणी,
दुसऱ्य़ाचे दुःख कोण समजणार?
प्रत्येकाची आहेत आपली रडगाणी! खूप भेटतात मित्र,सगे,सोयरे,पण दुःखात सहभागी होणारे अगदी मोजके,
कधी कधी तर आपले जवळचेच
वाटू लागतात जणू परके !
अशा वेळी कोणी अनोळखीच
जास्त जवळचा वाटू लागतो,आपल्या मनातल्या जखमांवर जो हळूवार फुंकर घालतो.
वरवर बोलणारे अनेकजण भेटतात..
पण असा एखादाच असतो,
जो तुमच्या अंतर्मनाला स्पर्श करून जातो!
तुमच्या हसऱ्य़ा मुखवट्यामागचा खरा चेहरा जो बघू शकतो!

Wednesday, September 2, 2009


मैत्री म्हणजे मायेची साठवण|मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण| हा धागा नीट जपायचा असतो | तो कधी विसरायचा नसतो| कारण ही नाती तुटत नाहीत,ती आपोआप मिटुन जातात| जशी बोटांवर रंग ठेवुन फुलपाखरे हवेत उडून जातात!!!


अनेकदा विचारले तिला

पण तिच्याकडेही उत्तर नसे

मग तुकड्या तुकड्याने

माझे मलाच ते सुचत गेले

.... काहीतरी चुकत गेले

दिवस होते मंतरलेले

चिंब भिजण्याचे, बुडून जाण्याचे

आनंदात, एकमेकात

तरी मिठीत दोघांना काहीतरी खुपत गेले

.... काहीतरी चुकत गेले

दिवस होते धागे विणण्याचे

रेशमाचे, जरतारीचे

आयुष्यांना एकमेकात गुंफण्याचे

वस्त्र गुंफता गुंफताच कुठेतरी विरत गेले

.... काहीतरी चुकत गेले

दिवस होते उमेदीचे

चिवचिवत काड्या जमवण्याचे

घरटे बांधण्याचे

कळस गाठण्याआधीच घर जरा खचत गेले

.... काहीतरी चुकत गेले

काय घडले, कोण चुकले ?

पडत मात्र गेली शकले

मौनाचे वास्तव्य ओठांवरती वाढत गेले

अन् पाणी हळूहळू डोळ्यांमध्ये भरत गेले

.... काहीतरी चुकत गेले

.

--

रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.